पानगळ
कसल्या दुःखाने सुचते गाणे
गळतात पाने झाडांचीही....हे माझं एक अत्यंत आवडतं चित्र आहे. माझ्या हृदयाच्या एका नाजूक कप्प्यात मी त्याला कैक वर्षांपूर्वीच ठाणबंद केलं होतं. आहे, नेहमीच राहील.
पुर्वी त्या चित्रात हा फणस नव्हता. तो माझ्या आजीच्या हातानं चुकून लागला. रुजला. गंमत अशी, की त्याला नाहीसे करण्याचे अनेक प्रयत्न अनेकांनी करून पाहिले. अगदी ४ वर्षांपुर्वीची गोष्ट - माझ्या लग्नाच्या वेळी मंडप घालण्याच्या वेळी ते झाड आतापेक्षा अर्ध होतं. तेव्हा सजावटीला आणि मंडपाला अडसर होतो म्हणून शांताराम काकांनी कुणाला न विचारता त्याच्या फांद्या तोडून त्याला भुंडं करून टाकलं होतं. त्याची ती दशा पाहून पाहणारा प्रत्येक जण घटकाभर हळहळत असे. पण तरीही ते मेलं नाही. तरलं. उलटपक्षी आणखी जोमात वाढलं म्हणा ना!
पुर्वी त्या अंगणाचा कोबा भक्कम शाबूत होता. त्यावर क्रिकेटचे मी डाव टाकलेत, त्यावर बऱ्याचदा रात्री मी झोपून ताऱ्यांची आरास न्याहाळलीय. गेली चाळीसेक वर्षे त्या अंगणात देवांची पालखी उतरलीय. बरे वाईट प्रसंगदेखील घडलेत; माझ्या जन्मागोदरपासून ते आजवर... समाजाची सेवा आणि नेतृत्वाचा वसा ज्यांच्याकडून मला मिळाला असे माझे आजोबा म्हणजेच अण्णा हे त्या चित्राचा एक अविभाज्य भाग होते, आज नसले तरी आहेत आणि राहणार. ओटीवर त्यांची खास सागाची खुर्ची असे. त्यावर ते बसत. हजारो-लाखो तास त्यांनी तिथे बसून काढलेत. आपला सर्वात प्रिय मुलगा गेला ही बातमी देखील त्यांना तिथेच बसून असताना मिळाली असेल का? माहिती नाही. पण त्यानंतर ते तिथे बसले नाहीत. पप्पा गेल्यावर अन्नत्याग करून पाचव्या दिवशी त्यांनी देहत्याग केला. तेव्हा ते घरी नव्हते. मोठ्या आत्तेकडे होते. पप्पा गेल्याची खोल जखम अजुनी भळभळत असतानाच त्या रात्री त्यांचा जीव सोडून गेलेला देह घरी आला. त्या दुःखाचे वर्णन करता येईल मला? हृदयात खोल रुतलेल्या खंजिरावर नियतीने आपल्या हजारो हातांनी दिलेला तो विक्राळ दाब होता....
पुर्वी त्या चित्रातील घरांची कौले सक्षम होती. ती माझा भार लिलया पेली. मी कैक वेळा कौलांवर उताणा होऊन सरत्या वैशाखात शामल अभ्रांची चाहूल घेतलीय.
चित्रात घराशेजारी मळलेली वाट दिसतेय. या वाटेवरून म्हणे रात्री राखणदार घुंगुराची काठी टेकत जातो. करड्या पिंगळ्याने घर केल्यासारखी तिची भीती सदैव मनात घर करून असायची. म्हणून रात्री त्या वाटेवर उभे राहायचे मी टाळे. ती भीती केव्हा ओसरली देखील नाही आणि मी देखील केव्हा निर्भीडपणे तिथं हुल्लडबाजी केली नाही. हा बंध कायम आहे म्हणून माझ्या मनात तिच्याविषयी खास आस्था आहे.
समोरच जो छोटा लोखंडी गेट दिसतो, तो खरं तर घरचा मुख्य प्रवेशद्वार नाही पण त्याने मुख्य प्रवेशद्वाराची भूमिका विनातक्रार नेहमीच निभावली. कारण तो पायवाटेला समांतर होता आणि नेहमीच घरात शिरायला राजरोसपणे त्याचाच वापर होत आला. त्याच्या डाव्या बाजूला पुढे असणारा त्याच्या दुप्पट मोठ्या असणाऱ्या द्वाराचा मान तरीही नेहमी अबाधित राहत आला आहे. तिथून देवाची पालखी आत येते. आत्मा सोडलेली कुडी देखील तिथूनच बाहेर जाते. नववधू देखील इथूनच आत येते.... माझ्या अण्णांची आंघोळ करण्याची खास जागा म्हणजे या द्वाराचा उंबरा! कोणतीही आत्या आली की ती हट्टाने अण्णांना इथं बसवून आंघोळ करायला भाग पाडी. अण्णांना झालेला लकवा हा या घरासाठी वरदान होता का? कारण अनेक वर्ष त्यामुळेच त्या या घराचा आणि आमच्या आठवणींचा अविभाज्य भाग होते. आहेत आणि राहतील...
अंगणाला असलेला कट्टा ही खऱ्या अर्थानं मोठी शोभा आहे. गावात अशी दुसरी जागा नाही. इथे लोक येऊन बसत. बोलत. आपल्या खाजगी, सार्वजनिक बातम्यांचे पुडे सोडत. ते ऐकून ऐकूनच याला इतका भक्कमपणा आला असेल का?
ती मागची तुळस... किती जणांचे हात जोडले गेलेत तिच्या पुढ्यात. तिनं किती सोसलंय. अगोदर त्या वृंदावनाचा थाट और होता. रोजची पूजा, दिवाबत्ती, एव्हाकेव्हा नैवेद्य.... तिच्यातल्या तुळशीचं बीज अस्सल आहे. कितीही वेळा रोपा मेलं तरी पावसात ते उगवून येतं. ही विजिगीषू वृत्ती आपल्यात कायम का राहत नाही?

अनेक आठवणी अनेक अगम्य प्रश्नांना जन्म देतात. माझं दुसरं वास्तवात जगणारं मन मला नेहमी प्रश्न विचारतं. भावभावनांच्या माश्या सतत आठवणींचे पोळे बांधत राहतील... त्या थकणार नाहीत, तो त्यांचा धर्म आहे. तुझं काय? तू गतकाळात रमतोयस, तिथेच गुरफटला जातोयस, तुझा धर्म काय?
हा माझा धर्म नाही का? ज्या वास्तूने, ज्या घटनांनी मला माणूस म्हणून समृद्ध केलं त्यांची परतफेड मलाच काय, कुणाला करता येईल का? माझ्या आठवणी माझा धर्म आहे, माझी माणसं आणि त्यांनी त्यांनी माझ्यावर केलेले संस्कार हाच माझा धर्म आहे. माझा श्वास आहे.
सांगू का? पटत नाही कुणाला. ते म्हणतात तू इथं का वेळ देतो? काहीतरी नवीन कर.... गेली तीस दशकं मी माझं घर, माझी जमीन, माझे नातेवाईक, माझा गाव, माझे सगेसायरे अनुभवत आहे. त्यात मी नेहमीच उणा पडलो असेन. पण म्हणून मी माझे कर्तव्य नाकारेन असे अजिबात नाही.
मला जे भरभरून मिळाले आहे त्याची उतराई व्हायला मी माझ्या प्राणाचा शेवटचा थेंब असतोवर प्रयत्न करेन.
पण जोवर हे मी करत नाही, तोवर अनेक आणि अगम्य दुःखाचे गाणे माझ्या मनात वाजत राहील आणि आठवण देत राहील की माझीही पाने आता गळत आहेत....

Comments
Post a Comment