Posts

Showing posts from March, 2025

पानगळ

Image
  कसल्या दुःखाने सुचते गाणे गळतात पाने झाडांचीही.... हे माझं एक अत्यंत आवडतं चित्र आहे. माझ्या हृदयाच्या एका नाजूक कप्प्यात मी त्याला कैक वर्षांपूर्वीच ठाणबंद केलं होतं. आहे, नेहमीच राहील. पुर्वी त्या चित्रात हा फणस नव्हता. तो माझ्या आजीच्या हातानं चुकून लागला. रुजला. गंमत अशी, की त्याला नाहीसे करण्याचे अनेक प्रयत्न अनेकांनी करून पाहिले. अगदी ४ वर्षांपुर्वीची गोष्ट - माझ्या लग्नाच्या वेळी मंडप घालण्याच्या वेळी ते झाड आतापेक्षा अर्ध होतं. तेव्हा सजावटीला आणि मंडपाला अडसर होतो म्हणून शांताराम काकांनी कुणाला न विचारता त्याच्या फांद्या तोडून त्याला भुंडं करून टाकलं होतं. त्याची ती दशा पाहून पाहणारा प्रत्येक जण घटकाभर हळहळत असे. पण तरीही ते मेलं नाही. तरलं. उलटपक्षी आणखी जोमात वाढलं म्हणा ना! पुर्वी त्या अंगणाचा कोबा भक्कम शाबूत होता. त्यावर क्रिकेटचे मी डाव टाकलेत, त्यावर बऱ्याचदा रात्री मी झोपून ताऱ्यांची आरास न्याहाळलीय. गेली चाळीसेक वर्षे त्या अंगणात देवांची पालखी उतरलीय. बरे वाईट प्रसंगदेखील घडलेत; माझ्या जन्मागोदरपासून ते आजवर... समाजाची सेवा आणि नेतृत्वाचा वसा ज्यांच्याकडून मला म...